‘चॅटिंग’ प्रसारित करण्याची धमकी देत धर्मांधाने अल्पवयीन मुलीकडून उकळले ११ तोळे सोने !
अहिल्यानगर – सामाजिक माध्यमावर केलेले संभाषण प्रसारित करण्याची धमकी देत रेहान शेख याने अल्पवयीन मुलीकडून ११ तोळ्यांचे दागिने आणि रोकड असा ७ लाख १० सहस्र रुपयांचा ऐवज उकळला. पीडित मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रेहान शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
वडिलांच्या भ्रमणभाषवरून पैसे पाठवले !
९ सप्टेंबरला रेहान याने मुलीला, ‘तू मला पैसे दिले नाहीस, तर तुझे आणि माझे ‘इंस्टाग्राम संभाषण’ मी तुझ्या आई-वडिलांना पाठवेन’, अशी धमकी दिली होती. धमकीला घाबरून पीडितेने वडिलांच्या भ्रमणभाषवरून रेहानला पैसे पाठवले. त्यानंतर पीडिताने तिच्या आईचे कपाटात ठेवलेले ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने रुमालात बांधून घराच्या सज्जातून रेहानला दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|