सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त सातारा जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सातारा येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. सौ. माधवी महेश कोकाटे, वडूज, जिल्हा सातारा.

अ. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाला जाण्याची संधी मिळाल्यापासून मला भावावस्था अनुभवता आली.

आ. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करत असतांना त्यांच्या छायाचित्रामध्ये ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले झुल्यावर बसले आहेत’, असे मला स्पष्टपणे दिसले. मी ३ मिनिटे भावावस्था अनुभवली.

इ. मी कार्यक्रम स्थळी पोचल्यावर तेथील सर्व दृश्य पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.

ई. ‘माझी पात्रता नसतांनाही हिंदु राष्ट्राची पहाट पहायला मिळत आहे’, याची मला जाणीव होऊन केवळ कृतज्ञता वाटत होती’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. मेघा कट्टे, वडूज, जिल्हा सातारा.

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जायचे आहे’, असे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.

आ. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे ‘मला ब्रह्मोत्सवाला जाता येणार नाही’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मला ‘गुरुमाऊली, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिव्य रथामध्ये बसून सर्वांना दर्शन देत आहेत’, असे चित्र वारंवार दिसत होते.

इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी माझी भावजागृती होत होती.

‘मी ब्रह्मोत्सवाच्या वेळी उपस्थित नसतांनाही देवाने मला अनुभूती दिली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

३. सौ. वृंदा फरांदे, वाई, जिल्हा सातारा.

३ अ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथात बसून कार्यक्रम स्थळी येत होते. त्या वेळी वातावरणात झालेला पालट मला प्रत्यक्ष अनुभवता आला. तेव्हा वातावरणातील उष्णता उणावली आणि सगळीकडे चैतन्याचा स्रोत पसरला.

२. मला पुष्कळ शांती आणि आनंद अनुभवता आला.

३. मला तीनही गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते.

४. ‘हा सोहळा संपू नये’, असे मला वाटत होते.

३ आ. ब्रह्मोत्सव झाल्यानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. ब्रह्मोत्सव झाल्यानंतरही मला अंतर्मुख रहाता आले. माझे मन निर्विचार झाले. मला काळजी वाटेनाशी झाली.

२. माझ्यात व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ तळमळीने करण्यासाठी आंतरिक प्रेरणा निर्माण झाली. ‘संत आणि उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक आज्ञापालन करून गुरूंची कृपा अनुभवत आहेत. त्याप्रमाणे मीही कृती करून गुरुचरणी समर्पित व्हायला हवे’, याची मला जाणीव झाली.

गुरुचरणी कृतज्ञता !’

४. सौ. मीरा मदन सावंत, कराड, जिल्हा सातारा.     

अ. ‘माझी प्रवासात पुरेशी झोप झाली नव्हती, तरीही मला थकवा जाणवला नाही.

आ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेव करत असलेल्या स्मितहास्यातून मला आध्यात्मिक लाभ होत होते.

इ. मला चैतन्य आणि आनंद जाणवत होते.

ई. ‘रथाच्या माध्यमातून तेज प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले

उ. सोहळ्याच्या वेळी माझ्या मनातील विचार न्यून झाले. माझे मन शांत, निर्विचार आणि आनंदी होते.’

५. श्री. सौरभ फरांदे, वाई, जिल्हा सातारा.

अ. ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेव रथातून मैदानात मार्गक्रमण करत असतांना ते ‘ब्रह्मांडाभोवती प्रदक्षिणा घालत आहेत’, असे मला जाणवले.

आ. ‘ब्रह्मांडातील सर्व जिवांवर गुरुदेव प्रीतीमय कृपावृष्टी करत आहेत’, हे जाणून मला गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता वाटली.

इ. ब्रह्मोत्सव झाल्यानंतर मला अंतर्मुख रहाता आले. माझे मन निर्विचार झाले. माझ्यातील प्रांजळपणा वाढला. मला साधनेत येणार्‍या अडचणी माझे दायित्व असलेल्या साधकांना सहजतेने विचारू लागलो.

‘न भूतो न भविष्यति ।’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सवात उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली’, त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’

(लेखातील सर्व सूत्रांचा मास : जून २०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक