दंगेखोरांना काठीचीच भाषा समजते !
अलीकडे सामाजिक माध्यमांतून खून, बलात्कार अशा स्वरूपात महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्याविषयीच्या बातम्यांचा पूर येत आहे. बांगलादेशामधील असाहाय्य हिंदू हे भीती आणि वेदना सहन करत याविषयीच्या चित्रफिती पहात आहेत. त्यांना राजकारणापासून वंचित ठेवल्याविषयी दोष देत असतांना सरकार मात्र ‘केवळ हिंदूंनी केलेला विरोध हा प्रशंसनीय आहे’, ‘कायदा या विषयात कृती करील आणि जे अपराधी आहेत, त्यांना शिक्षा केली जाईल’, असे केवळ वक्तव्य करत आहे.
१. हिंदूंवर होणार्या अत्याचाराविषयी सरकार आणि विरोधी पक्ष यांची सोयीस्कर भूमिका
दुर्दैवाने मतपेटीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षाचे नेतेही गप्प आहेत. त्यानंतर काही काळापुरती शांतता असते आणि त्यानंतर अशा प्रकारची भीषण घटना देशात किंवा कॅनडा, इंग्लंड, अमेरिका वगैरे विदेशी राष्ट्रांमध्ये घडते, तेव्हा सरकारकडून अधिकृतरित्या आधी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये काही फेरबदल करून परत एकदा तशीच प्रतिक्रिया देण्यात येते. विरोधी पक्षही नेहमीप्रमाणे त्यांच्या राजकीय हेतूसाठी शांत रहातात. त्यानंतर पुन्हा एकदा सगळे स्तब्ध होते आणि याविषयीचे गूढ तसेच रहाते. अशा परिस्थितीत समाजावर अत्याचार करणारे प्रत्येक घटनेनंतर अधिक धीट होतात हे उघड आहे; कारण या गुन्ह्यांसाठी त्यांना शिक्षा देणारी न्यायप्रक्रिया गोगलगायीच्या गतीने जात आहे, हे त्यांना ठाऊक आहे. कोणत्याही सत्ताधारी सरकारच्या उदासीन वृत्तीमुळे गुन्हेगार अजून बलवान होतात. त्यांना भारतातील आणि विदेशातील हिंदुविरोधी शक्तींकडून उघड अन् छुपेपणाने पाठिंबा मिळतो. त्यामुळे बहुसंख्य असलेले हिंदु मतदार असाहाय्य होतात. हिंदू त्यांचे जीवन, सन्मान आणि मालमत्ता यांचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही योग्य असे साहाय्य न मिळता तसेच रहातात.
२. गुन्हेगारी कायद्यामध्ये स्वसंरक्षणाच्या हक्काची विशेष योजना
कायद्याचा अभ्यास करणारे अधिवक्ता युक्तीवाद करतात की, घटनांमध्ये नागरिकांना जीवनाविषयीचे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि गुन्हेगारी कायद्यामध्ये स्वसंरक्षणाविषयीच्या हक्काची विशेष योजना आहे. तात्त्विकदृष्टीने हे खरे आहे. आवश्यकतेच्या वेळी हत्यार बाळगणे किंवा वापरणे यांच्या हक्काखेरीज जीवनाचा किंवा स्वसंरक्षणाचा हक्क हा पोकळ आदर्शवाद आहे. काठी, चाकू, तलवारी, बंदुका आणि इतर भयानक प्राणघातक शस्त्रे घेऊन येणार्या रक्तपिपासू जमावाला एखाद्याने नुसत्या रिकाम्या हातांनी प्रतिकार करावा, अशी अपेक्षा कुणी करू शकत नाही. या जमावाला मदरसा आणि चर्च यांमधून शिकवण अन् प्रशिक्षण मिळत असते. अलीकडेच काही ठिकाणी मदरशांवर घातलेल्या धाडींमध्ये प्राणघातक शस्त्रे सापडली. यावरून हिंदूंविरुद्धच्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे, हा याचा सबळ पुरावा आहे.
३. आम्ही स्वतःचे संरक्षण केले पाहिजे !
मग आम्ही याविषयी काय करू शकतो ? याचे सोपे उत्तर, म्हणजे यातून वाचण्यासाठी या ना त्या पद्धतीने आम्ही स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. ‘अखंड सावधानता’, हा स्वसंरक्षणाचा निश्चित मार्ग आहे. सरकारचे साहाय्य वेळेत मिळेल किंवा मिळणार नाही; परंतु अशा दंगेखोरांचा सामना करण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे. यासाठी आपल्या जवळ ज्या काही वस्तू आहेत, त्याचा आवश्यकता भासेल, तेव्हा शस्त्र म्हणून वापर करण्यास सिद्ध व्हा. सशस्त्र आक्रमण झाल्यास त्याचा सामना करण्याची सिद्धता करा. अत्याचार होत असतांना गप्प न रहाता तुमच्यापाशी असलेल्या पूर्ण शक्तीनिशी त्याचा प्रतिकार करा.
४. गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने करावयाच्या उपाययोजना
अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते. जे गुन्हेगार आहेत, विशेष करून प्रमुख गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर सुरक्षादलांनी सतत नजर ठेवली पाहिजे. आवश्यक असेल ते करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नियुक्ती करावी. स्थानिक लोकांना संपर्क करून तेथील माहिती मिळवून पोलिसांचे आवश्यक साहाय्य देण्याची योजना ठरवून त्यासाठी चांगले वेतन दिले पाहिजे. अशा प्रकारच्या पहार्याविषयी योजना सिद्ध करून तिची कार्यवाही करण्यासाठी कुप्रसिद्ध अशा आणीबाणीचा किंवा ब्रिटीश काळ यांमधील पद्धतींचे अनुकरण करता येऊ शकते. यापुढे जाऊन राज्यघटनेत सुधारणा करून नागरिकांना त्यांची मूलभूत कर्तव्ये करणे बंधनकारक आणि कायद्यानुसार सक्तीचे केले पाहिजे. याखेरीज सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी राष्ट्राविषयीचे विचार, संस्कृती आणि परंपरा यांना मान देऊन त्यांना प्राधान्य देण्यासारखी अतिरिक्त कर्तव्ये दिली पाहिजेत. या कर्तव्यांचे उल्लंघन करणार्या कडक शिक्षा देण्याचे प्रावधान (तरतूद) असले पाहिजे. शेवटी पण तेवढेच महत्त्वाचे, म्हणजे गुंड किंवा दंगेखोर यांना त्यांचे दिवस भरत आले आहेत आणि त्यांनी मध्ये शेपूट घालण्याचा प्रयत्न केला, तर सरकार त्यांच्याविरुद्ध त्वरित आणि कठोर कारवाई करील, हे त्यांना निःसंदिग्धपणे सांगितले पाहिजे.
– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.