Durga Puja Threat Bangladesh : दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्या !

  • खुलना (बांगलादेश) येथील मंदिरांना धमकीची पत्रे

  • पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची दिली धमकी !

  • अनेक मंदिरांनी दुर्गापूजा न करण्याचा घेतला निर्णय !

मंदिरांना धमकीची पत्रे

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील खुलना येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना धमकावले असून ‘दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (टका म्हणजे बांगलादेशी चलन) (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्यावे लागतील’, अशी धमकी दिली आहे. पैसे दिले नाहीत, तर ठार करण्याचीही धमकीही हिंदूना देण्यात आली आहे.

१. खुलना जिल्ह्यातील हिंदूंच्या अनेक मंदिरांना धमकीची निनावी पत्रे मिळाली आहेत. ही पत्रे टपालाद्वारे मंदिरांना पाठवण्यात आली आहेत.

२.  पत्रात लिहिले आहे की, जर तुम्हाला वर्ष २०२४ मध्ये दुर्गापूजा करायची असेल, तर तुम्हाला प्रत्येक मंदिरातून ५ लाख टका द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारे पूजा करता येणार नाही. अवामी लीगचे संयुक्त सचिव मेहबूब उल् आलम हनिफ यांच्या संदर्भात जे घडले, तेच तुमच्या नशिबी असेल. आठवडाभरात सर्व पैसे सिद्ध ठेवा. कालीनगर मार्केटमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी पैसे द्या. जागा नंतर सांगेन.

३. या पत्रात पुढे म्हटले आहे की, जर तुम्ही या गोष्टी प्रशासन, पत्रकार किंवा इतर कुणाला सांगितल्या, तर तुमचा हात कापला जाईल. तुमच्या कुटुंबालाही सोडले जाणार नाही. हे तुमच्या आजूबाजूच्या सर्व मंदिरांना सांगा; कारण आम्हाला सर्व मंदिरांची नावे ठाऊक नाहीत. प्रशासन आणि सैन्य यांना सांगून अन् आमची फसवणूक करून लाभ होणार नाही. आम्हाला पैसे द्यावे लागतील. जर आम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर आम्ही तुमचे तुकडे करू. आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत.

४. ही पत्रे ९ सप्टेंबर २०२४ या दिवशी लिहिलेली आहेत. आता ती हिंदूंची मंदिरे आणि पूजा समिती यांचे अध्यक्ष अन् सरचिटणीस यांना पाठवण्यात आली आहेत. ती मिळाल्यानंतर खुलना येथील ४ वेगवेगळ्या मंदिरांनी दाकोप पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पत्रे दाखवून तक्रारी केल्या आहेत.

५. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी ‘पत्रे कुठून आली आहेत ?, याची चौकशी चालू आहे’, असे सांगितले. मंदिरांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू. सैन्याच्या तुकडीसह आम्ही नियमित गस्त घालत आहोत. ग्रामीण पोलीस आणि केंद्रीय पोलीस अधिकारी २४ घंटे गस्त घालत आहेत, असेही ते म्हणाले.

हिंदूंची मंदिरे आणि पूजा समिती यांना मिळालेले धमकीचे पत्र –

६. एका मंदिराच्या सरचिटणीसांनी सांगितले की, पत्र मिळाल्यानंतर ते या प्रकरणामुळे फार चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या भागातील लोकांची बैठक घेतली आहे. ‘या वर्षी पूजेचे आयोजन न करणे चांगले होईल’, असे लोकांचे मत होते; परंतु शेवटी ‘पूजा सामूहिकपणे करावी’, असे काहींनी सांगितले.

७. काही मंदिर समित्यांनी धोक्यामुळे दुर्गापूजेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी शांततेत पूजा आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.

८. दाकोपच्या कमरखोला सर्वजनीन दुर्गापूजा उत्सव समितीचे अध्यक्ष शेखरचंद्र गोल्डर यांनी सांगितले की, यंदा पूजेचे आयोजन अत्यल्प प्रमाणात होणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय हिंदु आघाडीने दुर्गापूजेविषयी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. सुरक्षेसाठी तेथे पोलीस कर्मचारी आणि सैनिक  तैनात करण्यात यावेत, जेणेकरून पूजेच्या वेळी गुन्हेगारांना कोणतीही गडबड करता येणार नाही.

संपादकीय भूमिका

बांगलादेशामध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आला आहे, होत आहे आणि होत रहाणार आहे. भारत आणि जगभरातील हिंदूंनी आतापर्यंत त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही, आताही काही करत नाही अन् पुढेही काही करणार नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !