दावणगेरे (कर्नाटक) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण करून हिंदूंच्या हत्येचा होता कट !

पोलिसांच्या एफ्.आय.आर्.मध्ये (प्रथम माहिती अहवालामध्ये) उल्लेख !

दागणगेरे (कर्नाटक) – येथे १९ सप्टेंबरच्या संध्याकाळी के.आर्. रोडवरील मुदेगौडू मल्लम्मा मुरिगेप्पा शाळेजवळ अनुमाने ७०-८० अन्यधर्मीय युवकांच्या गटाने आझाद नगरातील श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण करून हिंदूंच्या हत्या करण्याचा हा कट आखला होता, अशी माहिती पोलिसांच्या एफ्.आय.आर्.मध्ये (प्रथम माहिती अहवालामध्ये) नोंदवण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणूक जगळूर बस स्थानकाजवळील वॉटर टँकजवळ आली असता तिच्यावर दगडफेक झाली होती. नरसराज पेटे मुख्य रस्त्याच्या दिशेने आलेल्या अनुमाने ७०-८० युवकांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यामुळे तेथे उपस्थित पोलीस घयाळ झाले. लगेचच गट पांगवून मिरवणूक पुढे नेण्यात आली. या दगडफेकीच्या प्रकरणाशी संबंधित ६ एफ्.आय.आर्. नोंदवण्यात आले असून आतापर्यंत ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. पुराव्यांच्या आधारावर आणखी आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांनी दिली.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. सरकार या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची शक्यताही अल्पच आहे !