PM Modi Meets Palestinian President : पंतप्रधान मोदी यांनी न्‍यूयॉर्कमध्‍ये घेतली पॅलेस्‍टिनी राष्‍ट्राध्‍यक्षांची भेट

पॅलेस्‍टिनी राष्‍ट्राध्‍यक्ष महमूद अब्‍बास व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलने गाझामध्‍ये केलेल्‍या भीषण आक्रमणाच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्‍टिनी राष्‍ट्राध्‍यक्ष महमूद अब्‍बास यांची न्‍यूयॉर्कमध्‍ये भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गाझामधील मानवतावादी परिस्‍थितीविषयी तीव्र चिंता व्‍यक्‍त केली. तसेच गाझामध्‍ये शांतता आणि स्‍थिरता लवकरात लवकर पूर्ववत् करण्‍यासाठी भारताचे समर्थन असल्‍याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्‍या अमेरिकेच्‍या दौर्‍यावर गेले आहेत. या वेळी त्‍यांनी संयुक्‍त राष्‍ट्र महासभेच्‍या अधिवेशनाच्‍या वेळी महमूद अब्‍बास यांची भेट घेतली.