२४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबई – मुंबईमध्ये २४ ते २९ सप्टेंबर या काळात मुसळधार पावसची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व विदर्भातही हलका पाऊस पडू शकतो. नागपूरमध्ये २४ सप्टेंबर या दिवशी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे विभागाने सांगितले आहे. २७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.