पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील शैक्षणिक संस्थेसह हिंजवडीत गांजा विक्री !
१८ लाख रुपयांचा ३३ किलो गांजा जप्त !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथे गांजा विक्री करणार्या तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १८ लाख रुपयांचा ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे धुळे येथून गांजा तस्करी करून पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत, आयटी हब (माहिती-तंत्रज्ञान केंद्र) हिंजवडी आणि शैक्षणिक संस्था असलेल्या ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. या प्रकरणी सुरेंद्रकुमार त्रिपाठी, अशोक पावरा आणि पवन पावरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था आणि आयटी हब असलेल्या हिंजवडीत आरोपी गांजा विकत होते. उच्चशिक्षित तरुणांमध्येही गांजाचे व्यसन असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलेले आहे. (अद्यापही ठिकठिकाणी गांजा जप्त करण्यात येत आहे, म्हणजेच गांजाची तस्करी चालूच आहे. या तस्करीची पाळेमुळे खणून काढून पोलीस गांजामुक्त शहर केव्हा करणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकावाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय ! |