विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील मोठ्या प्रकल्पांचे भूमीपूजन किंवा उद्घाटन !

मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आरंभ करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पॉडटॅक्सी, कांजूरमार्ग कारशेडसह इतर कारशेडचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांचे भूमीपूजन होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे लोकार्पण, मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पाचे भूमीपूजन आदी कामांचाही यात समावेश असण्याची शक्यता आहे. ही सर्व कामे ४५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक खर्चाची आहेत.