क्रिकेटच्या बॅटने मारल्याने श्वानाचा मृत्यू !
ठाणे – येथील घोडबंदर येथील फियामा रेसिडेन्सी येथे गोकुळ थोरे (वय ३५ वर्षे) यांनी भटक्या श्वानाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने (चेंडूफळीने) मारल्याने श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घायाळ झालेल्या श्वानाला प्राण्यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले; पण उपचारांच्या काळात त्याचा मृत्यू झाला.