रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध केल्याच्या रात्री स्वप्नात मृत वडील आणि आतेभाऊ प्रसन्न दिसणे
‘५.१०.२०२३ या दिवशी श्री गुरूंच्या कृपेने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध करण्याची संधी मिळाली. ज्या दिवशी महालय श्राद्ध झाले, त्या रात्री माझ्या स्वप्नामध्ये माझे मृत वडील आणि मृत आतेभाऊ स्वप्नात आले. ते दोघेही अतिशय प्रसन्न दिसत होते. माझे आतेभाऊ मला प्रेमाने आलिंगन देऊन मला शाबासकी देत होते. त्या वेळी माझा कृतज्ञतेचा भाव जागृत झाला होता.’
– श्री. प्रकाश राऊत (वय ५६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |