रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.

संगीतयोग

१. श्री. अरविंद उमाकांत बिरादार (धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), धनकवडी, पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘पीपीटी’ पाहून ‘संगीत कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करता येते’, हे माझ्या लक्षात आले.’

२. श्री. राहुल शंकरराव पोतदार (व्यावसायिक), हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.

अ. ‘पीपीटी’ पाहून ‘हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचे काहीतरी आहे’, याची मला जाणीव झाली.’

३. सौ. स्वाती पांडेय, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र.

अ. ‘पीपीटी’ पाहून माझ्या लक्षात आले, ‘सात्त्विक वस्त्रे आणि अलंकार आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)