गणेशोत्सवकाळात २० लाखांहून अधिक प्रवाशांकडून मेट्रो प्रवास !

पुणे – येथील गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने गणेशमूर्ती पहाण्यासाठी बाहेरून पुण्यात येणार्‍यांची संख्या अधिक असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले. १० दिवसांत २० लाख ४४ सहस्र ३४२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रीच्या वेळी मेट्रोने प्रारंभी रात्री बारापर्यंत आणि नंतर मध्यरात्री दोनपर्यंत मेट्रो सेवा चालू ठेवली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी साडेतीन लाख प्रवाशांनी एका दिवसात मेट्रो प्रवास केला.