‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती साजरी !

बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी करतांना ‘पेशवा युवा मंचा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते

पंढरपूर, २१ सप्टेंबर (वार्ता.) – ‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने हिंदवी साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील रुक्मिणी पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ह.भ.प. उद्धव कुकुरमुंडेकर महाराज यांच्या शुभहस्ते आणि मंचाचे आधारस्तंभ श्री. महेशकाका टोणपे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

बाजीराव पेशवे यांच्या जयंतीच्या प्रसंगी भाविकांना प्रसाद वाटप करतांना ‘पेशवा युवा मंचा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते

या प्रसंगी पेशवा युवा मंचाचे अध्यक्ष श्री. अभिजित पुराणिक, सर्वश्री गणेश लंके, ओंकार कुलकर्णी, ज्ञानराज बेणारे, निखिल कुलकर्णी, गोपाळ बडवे, किशोर गलगलकर, आनंद रानरुई, अनिकेत बडवे, बाळासाहेब डिंगरे, समिहन पाठक, शंतनू उत्पात, श्रीराम बडवे, रोहन उत्पात, तुकाराम चिंचणीकर, मानस परिचारक, हरिभाऊ उत्पात यांसह अन्य उपस्थित होते.