Illegal mosques : हिमाचल प्रदेशात कोरोना महामारीच्या आधी ३९३ मशिदी : आज संख्या ५५० च्या पुढे !
|
शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेश राज्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. येथे केवळ राजधानी शिमल्यातील संजौली मशिदीचाच प्रश्न नाही, तर राज्यभरात अशा प्रकारच्या अनेक अवैध मशिदी उभ्या आहेत, असे वक्तव्य प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आणि हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री कमल गौतम यांनी केले. ‘सनातन प्रभात’ने नुकतीच गौतम यांची भ्रमणभाषवरून मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. गौतम हे माजी सरकारी शिक्षक असून त्यांच्या नेतृत्वाखालीच मशिदींच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात राज्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मशिदी उभारण्यात आल्या. राज्यात कोरोना महामारीच्या आधी ३९३ मशिदी होत्या. त्यानंतर त्यांची संख्या वाढून ती ५५० हून अधिक झाली. जिल्हानिहाय मशिदींची संख्या आमच्याकडे उपलब्ध आहे. (या वेळी गौतम यांनी ही सूची ‘सनातन प्रभात’ला पाठवली.)
Himachal Pradesh had 393 mosques before the COVID-19 pandemic; now that number has exceeded 550!
Staunch Hindu leader @kamalgautamhp informs Sanatan Prabhat
Numerous mosques have been built illegally.
This reflects an attempt by Mu$|!m$ to assert control over different states… pic.twitter.com/yz3eLKycHF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 23, 2024
हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री कमल गौतम पुढे म्हणाले की,
१. राज्यात झालेल्या लव्ह जिहादच्या घटनांतून आम्ही हिंदुत्वनिष्ठांनी गेल्या काही वर्षांत ९०० हिंदु मुलींना सोडवून घरी सुखरूप परत आणले आहे.
२. आम्ही ‘आर्.टी.टी. अभियान’ राबवण्यास आरंभ केला. याचा अर्थ आहे – ‘रोको, टोको, ठोको, अभियान’ ! याचा अर्थ आहे की, राज्यातील कोणत्याही गावाच्या बाहेर कुणी मुसलमान अथवा रोहिंग्या आला, तर त्याला रोखायचे. त्याने ऐकले नाही, तर त्याला टोकायचे आणि गावात येण्यापासून मज्जाव करायचा. जर तरी त्याने ऐकले नाही, तर त्याला चोप द्यायचा. अशा प्रकारे काही घटनाही घडल्या. यामुळे माझ्याविरुद्ध २-३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
३. आमचे पुढील पाऊल हे ‘जनता एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी) आहे. यालाही आरंभ झाला असून हिमाचल प्रदेशातील अनेक गावांच्या वेशीवर ‘बाहेरील मुसलमान अथवा रोहिंग्या यांनी गावात प्रवेश करू नये’, अशा प्रकारे फलक लावण्यात येत आहेत. आमच्या आया-बहिणींच्या शीलरक्षणार्थ आम्हाला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले आहे.
एवढे मोठे संघटन उभे रहाणे, ही ईश्वरी कृपाच ! – कमल गौतम
या वेळी गौतम म्हणाले की, आता मी कोणत्याही संघटनेच्या अंतर्गत कार्यरत नाही. संघटनेत असल्यास कार्याला मर्यादा येतात. आपण संकुचित रहातो. आता मी संपूर्ण हिंदु समाजाचा आहे. ईश्वरी प्रेरणेने आज राज्यात मोठे संघटन उभे राहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटन होणे, ही ईश्वरी कृपाच आहे.
हिमाचल प्रदेशात लक्षावधी हिंदू जागृत होऊन संघटित कसे झाले ?
आज भारतभरातील सर्वसामान्य हिंदू झोपलेले आहेत. हिंदूंवर कुठेही आघात झाला, तरी हिंदूंकडून त्या विरोधात संघटिपणे प्रत्युत्तर पहावयास मिळत नाही. यावरून तुम्ही राज्यात एवढे मोठे व्यापक संघटन उभे कसे केले, असे गौतम यांना विचारले असता, ते म्हणाले की, माझ्या बलीदानामुळे राज्यातील हिंदूंवर मोठा आघात झाला. मी हिंदुत्वासंबंधी विविध कार्ये करत असल्याने मला माझ्या सरकारी शाळेतील नोकरीतून ११ महिने निलंबित करण्यात आले होते. ही घटना जुलै २०२३ मधील असून काही मुसलमानांनी मनोहर या हिंदु तरुणाची हत्या केली होती. त्याला मी प्रखर विरोध करून आम्ही अनेक ठिकाणी आंदोलने केली. ही सर्व आंदोलने माझ्या नेतृत्वाखाली झाली. त्यानंतर सरकारी नोकरीतून मला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले. यामुळे राज्यातील हिंदू जागृत झाले आणि आज मोठे संघटन उभे होऊ शकले. हे सर्व ईश्वरी प्रेरणेनेच शक्य झाले, असे मी मानतो, असेही गौतम अत्यंत नम्रतेने म्हणतात.
संपादकीय भूमिकाभारतातील एकेक राज्य स्वत:च्या कह्यात घेण्यासाठीचा मुसलमानांचा हा एक प्रयत्न आहे. अवैध मशिदी उभारणे सरकारी, तसेच प्रशासकीय स्तरांवर साहाय्य मिळण्याविना शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ! |