Again Rail Jihad In Kanpur : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे रुळावर सापडला छोटा सिलिंडर !
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – रेल्वेगाड्यांचा अपघात घडवण्याचे षड्यंत्र सातत्याने समोर येत आहेत. कानपूरमध्येच अशा काही घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता कानपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ जे.टी.टी.एन्. गुड्स रेल्वेगाडी रुळावरून उतरवण्याचा कट रचण्यात आला. येथे रुळावर एक छोटा सिलिंडर ठेवलेला आढळून आला. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) सिलिंडर पहाताच आपत्कालीन ब्रेक लावला आणि सिलिंडरच्या १० फूट आधी रेल्वेगाडी थांबवली.
Gas Cylinder Found on Rail Track in Kanpur!
Conspiracy to derail the train
22nd incident in 57 days!
Govt to amend railway laws including harsher punishments :
– Life imprisonment
– Death penaltyThis is a form of ‘Railway Jih@d,’ and as long as there are people with a jih@di… pic.twitter.com/JK8JRhSUQV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 22, 2024
१. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, मालगाडी कानपूरहून प्रयागराजकडे जात होती. रुळावर ठेवलेला ५ किलोचा सिलिंडर रिकामा होता. उत्तरप्रदेशामध्ये ३८ दिवसांत रेल्वेगाड्या रुळावरून घसरवण्याचा हा ५वा कट आहे. यापूर्वी ८ सप्टेंबरला कानपूरमध्येच भरलेले सिलिंडर ठेवून कालिंदी एक्सप्रेस रुळावरून घसरवण्याचा कट रचण्यात आला होता.
२. देशात गेल्या ५७ दिवसांत रेल्वे रुळावरून घसरवण्याचा हा २२वा प्रयत्न होता. यापूर्वी २० सप्टेंबरला गुजरातच्या सूरतमध्ये रेल्वे रुळांमध्ये छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
रेल्वे कायद्यात सुधारणा करून त्यात जन्मठेपेपासून फाशीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करणार !
रेल्वे कायद्याच्या विद्यमान तरतुदींमध्ये रेल्वे अपघात घडवण्याचा कट रचल्याचे सिद्ध झाल्यास अधिकाधिक १० वर्षे कारावास आणि दंड यांची तरतूद आहे. आता या कायद्यात उपकलम जोडून तो देशद्रोहाच्या कक्षेत आणण्याची सिद्धता चालू आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे रुळांवर अडथळे ठेवणे हा अपघात घडवण्याचा कट आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवित वा वित्त हानी झाली, तर आरोपींविरुद्ध सामूहिक हत्येचे कलमही लावले जाऊ शकते. या अंतर्गत जन्मठेपेपासून फाशीपर्यंतच्या शिक्षेच्या तरतुदी असू शकतात. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. यासंदर्भातील नवीन तरतुदी लवकरच अधिसूचित केल्या जातील.
संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार
रेल्वे बोर्डाच्या अधिकार्याने सांगितले की, रेल्वे ट्रॅकवर पोलीस आणि गँगमन यांनी तपासणी वाढवली आहे. तसाच येत्या काही दिवसांत संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रेल्वे इंजिनांवरही कॅमेरे बसवण्याची योजना आहे, जेणेकरून प्रत्यक्ष देखरेख करता येईल. अशा स्थितीत रुळावर अडथळा निर्माण झाल्यास चालकांना आधीच त्याची माहिती होऊन गाडी थांबवता येणार आहे.
संपादकीय भूमिकाहा ‘रेल्वे जिहाद’चा प्रकार असून जोपर्यंत देशात जिहादी मानसिकतेवाले आहेत, तोपर्यंत देशात अशा प्रकारे जिहाद होतच रहाणार आहेत. जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी भारताने चीनचा आदर्श घेतला पाहिजे ! |