बदलापूर येथील विद्यार्थिनीवर अत्याचार केले ! – अक्षय शिंदे
बदलापूर – येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय पडताळणीच्या काळात आधुनिक वैद्यांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण केले आहे. विशेष न्यायालयात ५०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
हे प्रकरण ज्या शाळेत घडले, तेथील मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांना आता जामीन संमत झाला आहे.
अक्षयच्या दुसर्या पत्नीकडूनही त्याच्यावर आरोप !
अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या जबाबानंतर दुसर्या पत्नीनेही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. ‘तो अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा’, असा आरोप तिने केला आहे. अक्षयच्या विकृतपणामुळेच माहेरी निघून गेल्याचे तिने सांगितले.