पुणे येथील राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकांचे प्रकाशन !

‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या २ पुस्तिकांचे प्रकाशन !

पुस्तिकांचे प्रकाशन करतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज (मध्यभागी) आणि अन्य संत

पुणे – येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या हस्ते या वेळी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. समाजजागृती आणि राज्यघटनेच्या मूल्यांचा जागर या पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे. हिंदु धर्मातील जवळपास सर्वच संप्रदायांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. सर्व संप्रदायांच्या महंतांसोबत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी या वेळी बैठकीत धर्मचिंतन केले. वक्फचा विळखा आणि लोकसभेत झालेले एकगठ्ठा मतदान बघता या २ पुस्तिका समाजात सकारात्मक परिणाम आणू शकतील, असा सूर धर्मचिंतन बैठकीतून उमटला आहे. केंद्र सरकारच्या ‘वक्फ सुधारणा कायद्या’च्या पार्श्वभूमीवर या पुस्तिका माहितीपूर्ण ठरतील.