पुणे जिल्ह्यातून १४ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा हस्तगत !
पुणे – गणेशोेत्सवाच्या काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्.डी.ए.) पुणे जिल्हा आणि विभागांत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करत १४ लाख ३८ सहस्र रुपयांचा साठा हस्तगत केला आहे. पुणे जिल्ह्यातील ४७ अन्न आस्थापनांकडून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर आणि तिखटमिठाच्या पदार्थांचे ५३ नमुने, तर शहरातील १०१ आस्थापनांतून ११७ नमुने पडताळणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.