हुपरी येथील अवैध मदरशाविरोधात २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे यांची माहिती
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे. या संदर्भात सातत्याने निवेदन देऊनही, तसेच विविध मार्गांनी आंदोलन केल्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सोमवार, २३ सप्टेंबरपासून मी नगर परिषद, हुपरीसमोर सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण प्रारंभ करत आहे. माझ्यासमवेत शिवसेनेचे श्री. राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे श्री. प्रशांत साळोखे आणि श्री. प्रताप भोसले हेही त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. नितीन काकडे यांनी दिली आहे.