साधकाला सूक्ष्मातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाही ‘प्रतिदिन साधक समवेत आहे’, असे जाणवणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
एकदा मी प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. त्या वेळी आमच्यात पुढील संवाद झाला.
प.पू. डॉक्टर : ‘तू मला प्रतिदिन भेटतोस’, असे वाटते.
श्री. रामानंद परब : हो. तुम्ही प्रतिदिन सूक्ष्मातून माझ्या समवेत असता. मी खोलीत असतांना ‘तुम्ही आसंदीत बसले आहात’, असे मला दिसते. मी मूर्तीशाळेत सेवेला गेल्यावर ‘तुम्ही तिथे आसंदीत बसले आहात’, असे मला दिसते. ‘तुम्ही सूक्ष्मातून माझ्या समवेत २४ घंटे असता’, असे मला सतत जाणवते.
प.पू. डॉक्टर : हो. ‘मलाही तू प्रतिदिन भेटतोस’, असे वाटते. ‘तू आज माझ्याकडे सेवेला आलास’, असे मला वाटतच नाही. ‘आपण सतत समवेत असतो’, असे मला वाटते.’
– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२४)
|