Stone Pelting At Ganesh Immersion Procession : यवतमाळ आणि अकोला येथे धर्मांधांकडून गणेशमूर्तींवर दगडफेक !

  • यवतमाळ येथे गणेशभक्‍तांच्‍या आक्रमक पवित्र्यानंतर ९ धर्मांधांना अटक, ७० जणांवर गुन्‍हे नोंद

  • अकोला येथे ६८ जण कह्यात

दगडफेक करताना धर्मांध

यवतमाळ – येथील ढाणकी येथील छत्रपती संभाजी राजे चौकातील श्री राम बाल गणेश मंडळाच्‍या गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी धर्मांधांनी मुद्दामहून विद्युत्‌पुरवठा खंडित केला, तसेच यश कुबडे या गणेशभक्‍ताला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. गणेशमूर्तीवर दगडफेक करून तिची विटंबना करण्‍यात आली. यश कुबडे यांनी आरडाओरडा केल्‍यानंतर गणेशभक्‍त एकत्र जमले. ‘जोपर्यंत आक्रमणकर्त्‍यांना अटक होत नाही, तोपर्यंत मूर्ती विसर्जन करणार नाही’, अशी आक्रमक भूमिका गणेशभक्‍तांनी घेतली आणि आंदोलन चालू केले. पोलीस आश्‍वासन देत होते; मात्र गणेशभक्‍त ठाम होते. यानंतर पोलिसांनी ९ धर्मांधांना अटक करून एकूण ७० जणांवर गुन्‍हे नोंदवले. त्‍यानंतर गणेशमूर्ती विसर्जन करण्‍यात आली. आक्रमणकर्त्‍यांकडे लाठ्या, धारदार शस्‍त्रे आणि तलवारी होत्‍या. यावरून हे पूर्वनियोजित आक्रमण असल्‍याचे लक्षात येते. (हिंदूंच्‍या प्रत्‍येकच सण-उत्‍सवाच्‍या वेळी धर्मांध आक्रमण करत असल्‍याचे आतापर्यंतच्‍या अनेक घटनांमधून उघड झाले आहे. हे लक्षात घेऊन हिंदूंनीच स्‍वसंरक्षणासाठी सतर्क आणि सिद्ध रहायला हवे ! – संपादक)

अकोला येथील दगडफेकीत पोलीस घायाळ

अकोट (जिल्‍हा अकोला) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली. नंदीपेठ भागातील दगडफेकीत पोलीस आणि गणेशभक्‍त असे एकूण ११ जण घायाळ झाले. पोलिसांनी ६८ जणांना कह्यात घेतले. यानंतर सकल हिंदु समाजाने कडकडीत अकोट बंद पाळला.

संपादकीय भूमिका

मंदिरांप्रमाणे आता हिंदूंचे सण-उत्‍सवही असुरक्षितच ! हे रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र अपरिहार्य आहे !