Rail Jihad In Surat : सूरत (गुजरात) येथे रुळावरून रेल्वे उलटवण्याचा कट उघड !
सूरत (गुजरात) : येथे रुळावरून रेल्वे उलटवण्याचा कट उघडकीस आला आहे. ही घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली. किम रेल्वे स्थानकाजवळ तपासादरम्यान फिश प्लेट (२ रुळांना जोडणारा घटक) जप्त करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाने सांगितले की, काही अज्ञात चोरट्यांनी रुळावरून काही फिश प्लेट्स उघडून त्याच रुळावर ठेवल्या होत्या, त्यामुळे रेल्वेची वाहतूक थांबवण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तपासणी केली आणि त्यानंतर रेल्वे गाड्यांची वाहतूक चालू केली.
संपादकीय भूमिकादेशात रेल्वे जिहादच्या घटना सातत्याने वाढत आहेत. हे पहाता याविरोधात सरकारने कठोर होणे आवश्यक आहे ! |