Rajasthan Shani Temple Vandalized : जहाजपूर (राजस्थान) येथे अज्ञातांकडून नवग्रह शनि मंदिराची तोडफोड

नवग्रह शनि मंदिराची तोडफोड
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

जहाजपूर (राजस्थान) – येथे गणेशोत्साच्या वेळी मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर आता येथील नवग्रह शनि मंदिराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. नवग्रह शनि मंदिरातील मूर्ती तोडल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. कोटडी जहाजपूर मार्गावर हे मंदिर असून त्यातील ६ मूर्ती तोडून फेकून देण्यात आल्या होत्या.

शिवमंदिरात सापडला मासांचा तुकडा

जहाजपूरमधील शिवमंदिरात मांसाचा तुकडा सापडला. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने हिंदू येथे जमा झाले. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !