अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !
उदगीर (जिल्हा लातूर) – येथील ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख याला २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षाही देण्यात आली आहे. अब्दुल पीडित मुलीला खेळण्यासाठी भ्रमणभाष देत असे. या वेळी त्याने भ्रमणभाष देऊन तिच्यावर अत्याचार केला.