सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली
४ जण घायाळ
सांगली, २० सप्टेंबर (वार्ता.) – पुणे येथील ‘पोर्शे’ वाहनाच्या अपघाताप्रमाणे सांगली शहरातही असाच प्रकार घडला आहे. १८ सप्टेंबरच्या रात्री ८.३० वाजता कोटणीस महाराज मार्गावरून विरुद्ध दिशेने आणि भरधाव येणार्या एका चारचाकीने बालबापट शाळा आणि खाऊ गल्लीसमोरील १० दुचाकी वाहने उडवली, तर चौघांना धडक देऊन घायाळ केले. या वाहनाचा काही नागरिकांनी पाठलाग केला; मात्र शहर पोलीस ठाण्याच्या दिशेने ही गाडी निघून गेली. पांढर्या रंगाची ही गाडी असून त्यामध्ये २ तरुण बसले होते. सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही.