पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !
२ चोरांना अटक, चोर नाशिक आणि मध्यप्रदेशातील !
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या ३०० गणेशभक्तांचे भ्रमणभाष चोरण्याचे प्रकार घडले आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येत भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणा अस्तित्वातच नाही, हे दाखवून दिले. – संपादक) या प्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, खडक आणि समर्थ पोलीस ठाण्यांसह अन्य पोलीस ठाण्यात त्यासंबंधीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील भ्रमणभाष चोरांच्या टोळीतील २ जणांना पकडून त्यांच्याकडून २ लाख ७९ सहस्र रुपयांचे २१ भ्रमणभाष हस्तगत केले आहेत. अजीज खान आणि कालू राजू पारख अशी दोघांची नावे आहेत. उत्सवाच्या कालावधीत १० दिवसांमध्ये २५ भ्रमणभाष चोरीच्या घटना घडल्या आहेत.
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३ जणांचा मृत्यू !
श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या नयन ढोके, विशाल बल्लाळ आणि एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’ने दिली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे मात्र समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल.
तिघांवर प्राणघातक आक्रमण !
कुणाल बनसोडे आणि स्वप्नील मोरे हे दोघेजण टिळक रस्त्यावर मिरवणुकीमध्ये नाचत होते. एका अनोळखी तरुणाचा धक्का लागला. त्यांच्यात बाचाबाची झाली. अनोळखी तरुणाने त्यांना बाहेर काढत कुणाल बनसोडेच्या पोटात चाकूने वार केले. या प्रकरणी स्वप्नील मोरे याने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. भवानी पेठेतील कासेवाडी भागात मिरवणुकीमध्ये किरकोळ वादातून निखिल चौधरी याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी धर्मांध जईद तांबोळी, बिलाल खान, लतीफ शेख, चुव्वा यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. (हिंस्र वृत्तीचे धर्मांध ! लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य असतात. – संपादक) स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ मनोज मिझार याच्यावर कठीण वस्तूने प्रहार करून घायाळ केले आहे. या प्रकरणी मोहन सोनार आणि राकेश सोनार यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
३.५ टन पादत्राणे आणि १६७ टन कचरा !
श्री गणेशमूर्ती विसर्जन मार्गांच्या रस्त्यांवरून अनुमाने ३.५ टन पादत्राणे आणि १६७ टन इतर कचरा गोळा करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये हा कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.