गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन
श्री तिरुपती बालाजी देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरल्याचे प्रकरण
पणजी, २० सप्टेंबर – जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी गोमंतक मंदिर महासंघ २१ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोमंतक मंदिर महासंघाने केले आहे.