थोडक्यात महत्त्वाचे : एशियाटिक सोसायटी कह्यात घ्यावी, अशी सरकारकडे मागणी !; बसवाहकावर आक्रमण करणारा धर्मांध अटकेत
एशियाटिक सोसायटी कह्यात घ्यावी, अशी सरकारकडे मागणी !
मुंबई – येथील २२० वर्षे जुनी असणारी ऐतिहासिक ‘एशियाटिक सोसायटी’ हे ग्रंथालय त्याच्या व्यवस्थापकीय समितीचा उदासीन कारभार आणि अपुरा निधी यांमुळे डबघाईला आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ही संस्था कह्यात घ्यावी, अशी मागणी ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एम्प्लॉईज् युनियन’चे अध्यक्ष कॉ. प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. सध्या येथे २५ कर्मचारी कार्यरत आहेत.
बसवाहकावर आक्रमण करणारा धर्मांध अटकेत
मुंबई – धारावी येथे बेस्ट बसमध्ये शिरून पैशांची पिशवी चोरण्यासाठी बसवाहकावर चाकूने आक्रमण करणारा आरोपी शाहबाज खान याला पोलिसांनी ४ घंट्यांत अटक केली. त्याच्याकडून चाकू आणि वाहकाचा चोरलेला भ्रमणभाष जप्त केला. वाहकाच्या शरिरावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिका
• सार्वजनिक ठिकाणी बसवाहकावर चोरीसाठी आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होणे, हे त्यांच्या उपद्रवाने परिसीमा गाठल्याचे द्योतक !
• अशा धर्मांधांना कारागृहातच डांबायला हवे !
भ्रमणभाष न दिल्याने तरुणीची आत्महत्या !
डोंबिवली – आईने भ्रमणभाष हाताळण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात १९ वर्षांच्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजना हेमांगी झोरे असे तिचे नाव आहे.
संपादकीय भूमिका : तरुणाईतील संयम नष्ट होत चालल्याचे दर्शक !
फटाके अंगावर पडून महिला भाजल्या !
नागपूर – येथील उमरेडमध्ये गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ११ महिला भाजल्या आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. एका निर्माणाधीन इमारतीवर फोडण्यात येणारे फटाके आग लागल्यावर वर न जाता खालच्या दिशेने गेले आणि ते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडले.
पुण्यात भूमी खचून टँकर खड्ड्यात पडला !
पुणे – पुण्याच्या समाधान चौकात पुणे महापालिकेचा पाणी पुनर्वापर प्रक्रिया करणारा टँकर पेवरच्या रस्त्यावरून पुढे जात असतांना भूमी खचून पडलेल्या खड्ड्यात मागील बाजूने पडला. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रथम नेमके काय झाले ? हे चालकाच्या लक्षात आले नाही; मात्र त्याने बाहेर उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. हा टँकर काढण्यासाठी सायंकाळपासून प्रयत्न चालू झाले. अडीच घंटे केलेल्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने टँकर बाहेर काढण्यात आला. या ठिकाणी पुरातन विहीर असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.