अवैध मदरशाचे बांधकाम २४ घंट्यांत काढा
हुपरी नगरपालिकेची ‘मुस्लीम सुन्नत जमीयत’ला नोटीस
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – येथील सरकारी गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर ‘मुस्लीम सुन्नत जमीयत’ने उभारलेले मदरशाचे बांधकाम २४ घंट्यांत काढून घ्यावे; अन्यथा हुपरी नगरपालिका ते अतिक्रमण हटवेल, अशी नोटीस हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय नरळे यांनी ‘मुस्लीम सुन्नत जमीयत’ला १९ सप्टेंबरला दिली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी यांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीने निवेदन देऊन अवैध बांधकाम न हटवल्यास २३ सप्टेंबरपासून आंदोलनाची चेतावणी दिली होती. याच समवेत बजरंग दल आणि ‘दुर्गवेध प्रतिष्ठान’ यांनीही नगरपालिकेला निवेदन दिले आहे.