रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्री. भरत सखाराम पाटील (संपादक, ‘नाथनगरी’ वृत्तपत्र आणि विश्वस्त, श्रीनाथदेव देवस्थान), खरसुंडी, सांगली, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रमातील प्रत्येक साधकाचे प्रामाणिक योगदान आश्रमाच्या एकूण कार्यात मोलाची भर घालत आहे.

आ. आश्रमाचे एकूणच कार्य आदर्श आहे.

इ. प्रत्येक साधक धर्मकार्याचाच एक भाग म्हणून सेवा करत आहे.

ई. हा आश्रम म्हणजे प्रत्येक हिंदु व्यक्तीला मौलिक मार्गदर्शन मिळवून देणारे केंद्र आहे.’

२. श्री. महेंद्र बाळासाहेब बोबडे (केंद्रप्रमुख, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित), पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘माझ्या हातून काहीतरी पुण्य घडल्यामुळे माझा या आश्रमात येण्याचा योग आला आणि माझा आत्मविश्वास वाढला.’

३. सौ. मनीषा सागर तुपे (विश्वस्त, श्री तुकाई माता सेवा ट्रस्ट), पुणे, महाराष्ट्र.

अ. ‘या आश्रमाचा भारतातच नाही, तर जगभर प्रसार व्हावा’, असे मला वाटते.’

४. श्री. सागर हिरामन तुपे (सचिव, श्री तुकाई माता सेवा ट्रस्ट), पुणे, महाराष्ट्र. 

अ. ‘मला येथे बरेच ज्ञान प्राप्त झाले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२४)

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर एका धर्मप्रेमींनी दिलेला अभिप्राय

 श्री. स्वरूपकुमार भागचंद लुंकड, जळगाव, महाराष्ट्र.

‘आश्रम म्हणजे अप्रतिम संस्कृतीचे साक्षात् दर्शन होय.’

(२७.६.२०२४)