Fire In Kashi Vishwanath Temple : काशी विश्‍वनाथ मंदिरात पहाटे आरतीच्या वेळी ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागली आग

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिरात पहाटे साडेचार वाजता मंगला आरतीच्या वेळी ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. मंदिर परिसरात तैनात असलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे भाविकांचे दर्शन थांबले. जवळपास १ घंटा भक्तांना दर्शन करता आले नाही. आता मंदिर परिसरात दुरुस्तीचे काम चालू आहे. ‘शॉर्ट सर्किट’ झालेली वायर पूर्णपणे पालटण्यात आली.