देशविरोधी घोषणा देणार्‍या ६ मुसलमानांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

चित्तोडगड (राजस्थान) – देशविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी चित्तोडगड जिल्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी ६ जणांना ५ वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. बबलू शोएब, हैदर खान, शौकत खान, आबिद हुसैन, आरिफ अन्सारी आणि मोईनुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना प्रत्येकी १ महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. वर्ष २००९ या दिवशी शहरातील उरूसाच्या (एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सवाच्या) मिरवणुकीत आरोपींनी ‘हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान झिंदाबाद’ अशा प्रक्षोभक घोषणा देऊन धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.

न्यायालयाने म्हटले की, धार्मिक आरोग्य बिघडवणार्‍या लोकांना कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, जेणेकरून समाजातील असामाजिक घटकांकडून पसरवलेल्या वैमनस्याला आळा बसेल आणि सर्वसामान्य जनतेला योग्य संदेश मिळेल.

संपादकीय भूमिका

‘अशांना शिक्षा भोगल्यानंतर पाकिस्तानात पाठवण्याचाही आदेश देण्यात यावा’, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !