इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रमातील श्री गणेश यागानंतर यज्ञकुंडात श्री गणेशाचे रूप प्रकटले !
इंदूर (मध्यप्रदेश) – सनातनचे श्रद्धास्थान, तसेच शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या येथील भक्तवात्सल्याश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. यानिमित्त १६ सप्टेंबर या दिवशी श्री गणेश याग करण्यात आला. यागाला श्री. रवींद्र कर्पे आणि सौ. वर्षा कर्पे यजमान होते. यागामध्ये १ सहस्र मोदकांची आहुती देण्यात आली. त्याच वेळी भक्तांकडून अथर्वशीर्षाची १ सहस्र आवर्तने करण्यात आली. याग संपल्यानंतर यज्ञकुंडात श्री गणेशाचे रूप प्रकट झाल्याचे दिसून आले. या यागाच्या वेळी डॉ. (सौ.) कुंदा आठवले, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट आदी उपस्थित होते.