‘नामजपादी उपायांचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी तळमळ असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !
‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे) २ मासांपासून रुग्णाईत आहेत. त्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) पू. दातेआजींसाठी प्राणशक्तीवहन पद्धतीने शोधलेले नामजपादी उपाय करत आहेत. त्यामुळे पू. दातेआजींमध्ये लक्षणीय पालट होत आहेत’, याविषयी त्यांच्या स्नुषा सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांनी मला माहिती दिली. तेव्हा मला वाटले, ‘सनातनचे संत ऋषितुल्य आहेत. ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचा समष्टीला लाभ व्हावा’, अशी पू. दातेआजींची तळमळ आहे.’
माझ्या मनात पू. दातेआजी आणि असे संत घडवणारी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञताभाव दाटून आला.’
– सौ. शुभांगी शेळके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.८.२०२४)