व्यायाम करतांना शरिराला घाम येत नसेल, तर व्यायाम परिणामकारक होत नाही का ?
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(भाग ११)
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835118.html
‘व्यायाम करतांना शरीर गरम झाल्यामुळे घाम येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते; परंतु ही प्रक्रिया नेहमीच व्यायामाची परिणामकारकता दर्शवत नाही. ‘कार्डिओ’, म्हणजे हृदय आणि फुप्फुसे यांची क्षमता वाढवण्यासाठीचे व्यायाम प्रकार, उदा. धावणे, सायकल चालवणे इत्यादी करतांना घाम येतो, तर शक्ती वाढवणारे व्यायाम प्रकार (स्ट्रेंथ ट्रेनिंग), उदा. दंड, बैठका, ‘वेट लिफ्टिंग’ इत्यादी अन् योगासने करतांना तितकासा घाम येत नाही, तरीही ते लाभदायक आहेत.
व्यायामामुळे शरिरावर आंतरिक परिणाम होणे, उदा. हृदयाचे ठोके वाढवणे, स्नायूंच्या क्षमतेला आव्हान देणे इत्यादी अधिक महत्त्वाचे आहे आणि व्यायाम करतांना ते आपोआप होतच असते; म्हणून व्यायाम करतांना घाम येत नसेल, तरी काळजी न करता सक्रीय रहाण्यावर लक्ष केंद्रित करा !’ (८.९.२०२४)
– श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.
या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/837292.html