SC On Padmanabha Temple : पेर्डूरु (कर्नाटक) येथील प्राचीन अनंत पद्मनाभ मंदिराला धक्का न लावता राष्ट्रीय महामार्ग बांधा ! – न्यायालय
उडुपी (कर्नाटक) – पेर्डूरु येथील प्राचीन अनंत पद्मनाभ मंदिराला धक्का न लावता राष्ट्रीय महामार्ग बांधा, असा आदेश न्यायालयाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला दिला. या मंदिराच्या सुरक्षेसाठी स्थानिक रहिवासी रंजीत प्रभु आणि मंदिराचे व्यवस्थापन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
मंदिराच्या बाजूने युक्तीवाद करतांना अधिवक्ता केतन कुमार बंगेरा म्हणाले, ‘‘महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेर्डूरुमधील अनंत पद्मनाभ मंदिराच्या वास्तूला हानी पोचेल, तसेच मंदिराच्या रथमार्गाची हानी होईल.’’ यावर न्यायालयाने ‘महामार्ग विस्तार किंवा कोणत्याही विकासकामाच्या वेळी मंदिरांसह धार्मिक इमारतींना धक्का पोचत असल्यास संबंधित प्राधिकरणांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा’, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे या प्रकरणातही लोकांच्या धार्मिक भावना आणि समस्या लक्षात घेऊन प्राधिकरणाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा’, असा आदेश केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला दिला.