Sri Swaminarayan Temple : न्यूयॉर्क (अमेरिका) येथील खासदार टॉम सुओझी यांच्याकडून श्री स्वामीनारायण मंदिरावरील आक्रमणाचा संसदेत निषेध

अमेरिकी खासदार टॉम सुओझी यांनी केला निषेध .

न्यूयॉर्क (अमेरिका) – काही दिवसांपूर्वी येथील श्री स्वामीनारायण मंदिराची करण्यात आलेली तोडफोड, तसेच भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तेथील फलकावर आक्षेपार्ह शब्द लिहिल्याची घटना, यांचा न्यूयॉर्कमधील अमेरिकी खासदार टॉम सुओझी यांनी संसदेत बोलतांना निषेध केला.

टॉम सुओझी पुढे म्हणाले की,


१. द्वेष नेहमीच मानवी अस्तित्वाचा भाग आहे; परंतु आज आपण खूप द्वेषपूर्ण गुन्हे पहात आहोत. गुंडांनी हिंदु समाजाविरुद्ध द्वेष आणि कट्टरता यांच्या नावाखाली श्री स्वामीनारायण मंदिराची हानी केली.

२. हिंदू इतरांना हात जोडून ‘नमस्ते’ म्हणतात. त्या वेळी त्यांच्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी आदर असतो. आपणही एकमेकांशी अधिक आदराने वागले पाहिजे.

३. धर्मांधता आणि द्वेष यांची कृत्ये वारंवार का घडतांना दिसतात? हे अतिरेकामुळे घडत आहे का ? दायित्वाच्या अभावामुळे आहे का ? या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे ? कारण या समस्येचे ‘द्वेष’ नव्हे, तर ‘प्रेम’ हे उत्तर आहे.