Hindu Makkal Katchi Protest : चेन्नई (तमिळनाडू) येथील चिदंबरम् स्टेडियम बाहेर निदर्शने
|
(हिंदु मक्कल कत्छी म्हणजे हिंदु जनता पक्ष)
चेन्नई (तमिळनाडू) – बांगलादेशात जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांमुळे भारतात भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्यांची मालिका आयोजित न करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदु संघटनांकडून केली जात आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीसह अनेक संघटनांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) निवेदनही दिले आहे. तरीही हे सामने भारतात खेळवले जात आहेत. यातील पहिला कसोटी सामना चेन्नई येथील चिदंबरम् स्टेडियमवर १९ सप्टेंबरपासून चालू झाला.
🛑 JUST IN : Arjun Sampath of Hindu Makkal Katchi arrested in Chennai for protesting against the India – Bangladesh Cricket series alongwith 50+ Hindu activists.@imkarjunsampath shared with our assistant editor that @Indumakalktchi handed over a memorandum to the Chidambaram… pic.twitter.com/NNnh0R2yyW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 19, 2024
सकाळी हिंदु मक्कल कत्छी संघटनेने स्टेडियमबाहेर आंदोलन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Arjun Sampath arrested, for protesting against Bangladesh vs India cricket match. pic.twitter.com/g1jpFl0Egk
— Indu Makkal Katchi (Offl) 🇮🇳 (@Indumakalktchi) September 19, 2024
या आंदोलनानंतर हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी स्टेडियमच्या व्यवस्थापकांना सामना रहित करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यावर व्यवस्थापनाने सांगितले की, ‘बीसीसीआयशी आमचा कोणताही संबंध नाही; मात्र ‘आम्ही तुमचे म्हणणे कळवू.’ या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी या संघटनेच्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांना अन्यायकारकरित्या कह्यात घेतले, अशी माहिती श्री. अर्जुन संपथ यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
|