गुरुकृपेने अर्पितो ही भावपुष्पे मंगल चरणी ।
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ९.९.२०२४ या दिवशी वाढदिवस होता. त्यानिमित्त साधक श्री. प्रणव मणेरीकर यांना स्फुरलेले काव्य येथे पाहूया.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला आपला सत्संग बराच काळ लाभला. साधनावृद्धीच्या दृष्टीने मी लाभ करून घेण्यास उणा पडलो. जे काही तुमच्यासोबत अनुभवले ते अमूल्य आहे. आपण म्हणजे…
क्षात्रभावाची सगुण मूर्ती ।
साधकांवर असे सकल प्रीती ।। १ ।।
अनेक गुणांचा संगम ।
करी साधकांचे स्वभावदोष-निर्मूलन ।। २ ।।
गुरूंच्या शिकवणीचे अखंड पालन ।
गुरुकार्य अन् हिंदु राष्ट्र असे प्राण ।। ३ ।।
आपुल्या जन्मदिनी ।
गुरुकृपेने अर्पितो ही भावपुष्पे मंगल चरणी ।। ४ ।।
प्रेमळ सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी साष्टांग दंडवत ! प्रणाम !
– श्री. प्रणव मणेरिकर, देहली. (२१.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |