सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कालावधीत मुंबई अन् पालघर येथील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या आधी साधकांनी अनुभवलेली भावस्थिती

१ अ. सौ. शोभा धडके, सांताक्रूझ, मुंबई.

१. मला ‘ब्रह्मोत्सवासाठी जायचे आहे’, असे समजल्यावर पुष्कळ आनंद झाला.

२. माझ्याकडून प्रार्थना, कृतज्ञता आणि भावजागृती यांचे प्रयत्न अधिक होऊ लागले. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केल्यावर मला संतसोहळा दिसला. मला ‘गुरुदेव पितांबर नेसले आहेत आणि त्यांनी अलंकार धारण केले आहेत’, या रूपात दिसले अन् मला दिसलेल्या दृश्याप्रमाणेच गुरुदेव ब्रह्मोत्सवाच्या वेळी दिसत होते. त्यामुळे माझी सतत भावजागृती होत होती.

३. मी भगवंताला सतत प्रार्थना करत होते, ‘तूच ये आणि आम्हाला आमच्या गुरुदेवांचे दर्शन होण्यासाठी गोवा येथे ने.’ मी अशी प्रार्थना करत असतांना ‘भगवान श्रीकृष्ण त्याच्या रथातून सर्व साधकांना घेऊन जात आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसत असे.’

१ आ. श्रीमती श्वेता सतीश सावंत, सांताक्रूझ, मुंबई.

१. मला ‘ब्रह्मोत्सवाला जायचे आहे’, असे समजल्यावर पुष्कळ आनंद झाला.

२. मला सूक्ष्मातून गुरुदेवांचे विराट रूपात दर्शन झाले. मला दिसले, ‘त्यांनी दोन्ही हात लांब करून सर्व साधकांना कुशीत सामावून घेतले आहे. गुरुदेव सर्व साधकांना ‘या माझ्या बाळांनो’, असे म्हणून बोलावत आहेत.’ ‘आता साधकांचे त्रास दूर होणार आहेत’, असे मला वाटले.’

१ इ. सौ. प्राची भाटकर, मुलुंड, मुंबई.

१. ‘ब्रह्मोत्सवाच्या ८ दिवस आधी मी मानसपूजा करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘परम पूज्य तिरुपती बालाजीच्या रुपात रथात बसून स्मितहास्य करत आहेत.

२. सर्व साधकांनी हातात रथाची दोरी पकडली आहे आणि ते जणू काही तिरुपती बालाजीचा रथ ओढत आहेत. माझी पात्रता नसतांनाही परम पूज्यांनी मला रथाची दोरी धरायला दिली.’

मी मानसपूजा केल्यानंतर परम पूज्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

१ ई. श्रीमती अनिता शहाणे, कांदिवली, मुंबई.

१. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सत्संग झाल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. साधक ६ – ७ दिवस प्रवासाचे नियोजन करत होते. तेव्हा मला वाटले, ‘साधकांकडून मी नियोजन आणि व्यवस्थापन एवढे जरी शिकले, तरी मी पुष्कळ मिळवल्यासारखे होईल. मला त्यातून ‘इतरांचा विचार आणि प्रीती’ हे गुण शिकता येतील. मी पुष्कळ पुण्य केले आहे आणि ईश्वर माझा हात धरून घेऊन जात आहे.’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांनी अनुभवलेली भावस्थिती

२ अ. सौ. प्राची दळवी, परळ, मुंबई.

१. ‘मी गोवा येथे जाण्यासाठी पुष्कळ प्रवास केला; मात्र मला थकवा जाणवत नव्हता.

२. माझा भाव जागृत होत होता.

३. रथाचे दर्शन घेण्यासाठी मी रथासमोर उभी राहिल्यावर ‘मी एखाद्या पोकळीसमोर उभी आहे’, असे मला जाणवले.’

२ आ. सौ. अनिता जगताप, मिरा रोड, मुंबई.

२ आ १. गुरुमाऊलींचे विराट रूपात दर्शन होणे : ‘रथारूढ विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचे दर्शन झाल्यावर मी सूक्ष्मातून त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. मी प्रार्थना केली, ‘हे देवा, मला आता तुझ्याविना काहीच नको. केवळ तूच हवा आहेस.’ त्या क्षणी मला गुरुदेवांचे विराट रूपात दर्शन झाले. माझी दृष्टी त्यांच्या चरणांवर होती. मी वरती पाहिले, तर मला गुरुदेव आभाळाला भिडलेले दिसले. मला पिवळा प्रकाश आणि सर्वत्र कमळे दिसत होती.

२ आ २. गुरुमाऊलींना प्रार्थना करणे : गुरुमाऊलींचा रथ पुढे जात असतांना माझ्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. माझ्याकडून प्रार्थना होत होती, ‘देवा, या रज-तम वातावरणात तुम्हीच साधकांना साधना करण्यासाठी शक्ती देत आहात. तुम्ही सगळे करत असूनही नामानिराळे रहाता. किती काळजी घेता देवा ! ‘तुमच्यामुळेच या पामर जिवांना देवी-देवता आणि ऋषिमुनी यांचे दर्शन होत आहे’, त्याबद्दल कृतज्ञता !’

२ इ. श्री. धनराज पाटील, बोईसर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र.

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ रथात बसून मैदानात आले. तेव्हा मला पुष्कळ पांढरा शुभ्र प्रकाश दिसला.

२. ‘श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याप्रमाणे गुरुमाऊली विराट रूपात साधकांना गीता सांगत आहेत’, असे मला वाटत होते.

३. माझी भावजागृती होत होती.’

२ ई. सौ. स्वाती अमित हरेर, नेरूळ, मुंबई.

१. ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्यामुळे मला हलकेपणा जाणवला.

२. मला वाटले, ‘गुरुदेवांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी सर्व साधकांना सांगून त्यांना (गुरुदेवांना) कशाचाच मोह नाही’, हे दाखवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.’ गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारपत्र परिपूर्ण बनवले होते. त्यातून त्यांच्यातील ‘परिपूर्णता आणि दूरदृष्टी’ यांची मला प्रचीती आली.’

३. ‘देवाने प्रक्षेपित केलेल्या ऊर्जेने हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पुढच्या टप्प्यावर जाईल’, असे मला वाटले.’

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाची सांगता झाल्यानंतर साधकांनी अनुभवलेली भावस्थिती 

३ अ. सौ ऋतुजा विकास सणस, वडाळा, मुंबई.

१. ‘ब्रह्मोत्सवाची सांगता झाल्यानंतरही सोहळ्यातील दृश्ये पुनःपुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होती.

२. माझ्या नामजपात वाढ झाली.

३. मला आधीपेक्षा स्थिर वाटत आहे.’

३ आ. श्रीमती भारती पाठक, मालाड, मुंबई.

१. ‘मी घरी आल्यावरही मला ब्रह्मोत्सवातील दैवी प्रसंगांचे स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती.’

३ इ. सौ. मनीषा पाटील, बोईसर, जिल्हा पालघर

१. ‘मी घरी आल्यावर ब्रह्मोत्सवातील प्रसंग आणि अनुभूती माझ्या मुलांना सांगत होते. तेव्हा ‘अजूनही मी कार्यक्रमस्थळी आहे’, असे मला वाटत होते.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला ब्रह्मोत्सवाला जायला मिळाले’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

३ ई. श्री. रमेश मुंज (वय ७२ वर्षे), बोरिवली, मुंबई.

१. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर मला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे’, असे मला जाणवले. माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण दूर होऊन मला वेगळा उत्साह जाणवत होता.

२. ‘मी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे करायला हवेत’, असे मला वाटत आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा मास : मे २०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक