श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करा !
शाहूवाडी पोलीस ठाणे (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन स्वामीभक्तांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आले. हे निवेदन पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी स्वीकारले. या वेळी स्वामी समर्थ परिवाराचे भक्त आणि माजी नगरसेवक श्री. महेश कोठावळे, माजी नगरसेवक श्री. संजय मोरे, श्री. प्रमोद भिंगार्डे, श्री. संस्कार सपाटे, माजी नगराध्यक्ष श्री. उदयसिंह कोकरे-देसाई, सर्वश्री चारुदत्त पोतदार, महेश देसाई, शंकर साठे, विजय मोरबाळे, भरत पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.