योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ रहाण्यासाठी मनाचे सतत निरीक्षण करा !
‘साधनेबरोबरच साधकांनी आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. त्यासाठी वरचेवर मनाला न्याहाळून पहावे, ‘चुकून माझ्या मनाला इर्षेचे काही विचार चिकटले नाहीत ना ?’ एका इर्षेपायी बरेच दुर्गुण मनाला घेरून टाकतात. जवळचे मित्र, आप्तेष्ट किंवा आपल्यापेक्षा निम्न व्यक्ती यांचा विकास पाहून ‘आपल्याला प्रसन्न वाटत असेल’, तरच असे म्हणता येईल की, आपली ईर्षा आता लुप्त झाली आहे.’ (ऑगस्ट २००२)