आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते !
समजा आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा व्यवस्थापक आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले, तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले, तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल, तर ते कुठून मिळणार ? आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचेच फळ असते; पण ‘ते अमुक कर्माचे फळ आहे’, असे कळत नसल्यामुळे आपण त्याला ‘प्रारब्ध’ असे नाव देतो. दुःख कुणालाही नको असते; पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. जो संतांची किंवा सद्गुरूंची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने रहात नाही.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फेसबुकवरून साभार)