‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील मार्गिका १५ दिवसांत खुली !

मुंबई-पुणे प्रवास वाहतूककोंडीमुक्त होणार !

मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील दक्षिणेकडील म्हणजेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. या मार्गिकेमुळे मुंबई-पुणे प्रवास वाहतूककोंडीमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत.