धर्मांधांकडून वीज खंडित करून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !
|
बुलढाणा : जिल्ह्यातील जळगावजामोदमध्ये वायली वेस भागातील चौभारा परिसरातून श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक जात असतांना धर्मांधांनी वीज खंडित करून मिरवणुकीवर दगडफेक केली. ही घटना १७ सप्टेंबरला रात्री ९ वाजता घडली. या दगडफेकीत अनेक पोलीस आणि गणेशभक्त घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
१. एका उंच इमारतीच्या खिडकीतून धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच काहींनी खाली उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. यास प्रत्युत्तर म्हणून गणेशभक्तांनीही दगड भिरकावले. गणेशभक्तांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक १२ घंटे जागेवरच थांबवली !या घटनेनंतर गावातील १५ गणेशोत्सव मंडळांनी ‘जोपर्यंत दगडफेक करणार्या समाजकंटकाला पकडले जात नाही, तोपर्यंत आम्ही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे १२ घंटे उलटूनही मिरवणूक जागेवरच थांबली होती. |
२. १५० ते २०० लोक अचानक समोर आल्याने पोलिसांनी हवेत प्लास्टिकच्या गोळ्या झाडल्या.
३. पोलिसांनी धर्मांधांना शेवटपर्यंत कह्यात घेतलेच नाही. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांधांचे आक्रमण आणि पोलिसांकडून हिंदूंचीच गळचेपी, हे नित्याचेच झाले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे ! |