World Bank Bangladesh : अमेरिकेनंतर आता जागतिक बँकही बांगलादेशाला भरघोस आर्थिक साहाय्‍य करणार !

ढाका (बांगलादेश) – गृहयुद्धामुळे आर्थिक डबघाईला आलेल्‍या बांगलादेशाला अमेरिका आणि जागतिक बँक यांनी भरघोस आर्थिक साहाय्‍य घोषित केले आहे. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशाला २ अब्‍ज अमेरिकी डॉलर (३३ सहस्र ३२३ कोटी रुपये) रक्‍कम देणार असल्‍याची घोषणा जागतिक बँकेने केली आहे. ही रक्‍कम बांगलादेशाला पायाभूत सुविधा, विकास, आरोग्‍य सेवा आदींसाठी देण्‍यात येणार आहे. जागतिक बँकेचे प्रादेशिक संचालक अब्‍दुलाये सेक यांनी ढाका येथे अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांची नुकतीच भेट घेऊन त्‍यांना आर्थिक साहाय्‍य करण्‍याचे आश्‍वसन दिले.

यापूर्वी अमेरिकेने बांगलादेशाला २०० दशलक्ष डॉलर्सचे (१ लाख ६६ सहस्र कोटी रुपये) साहाय्‍य केले होते. बांगलादेशी अर्थ मंत्रालयाच्‍या माहितीनुसार हा पैसा युवकांचे कल्‍याण करणे, आरोग्‍य सेवांमध्‍ये सुधारणा करणे आणि व्‍यवसायाच्‍या संधी निर्माण करणे, यांसाठी वापरला जाईल.

संपादकीय भूमिका

हा पैसा बांगलादेशाच्‍या विकासासाठी नव्‍हे, तर हिंदूंविरुद्ध जिहाद करण्‍यासाठी वापरला जाणार आहे. त्‍यामुळे हे साहाय्‍य म्‍हणजे बांगलादेशमधील पीडित अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचा प्रकार आहे !