Congress Opposes Ganeshotsav PM Modi : इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्‍सवाला विरोध !

श्री गणेशाच्या दर्शनासाठी मोदी सरन्‍यायाधीशांच्या घरी गेल्‍याने काँग्रेसने केली होती टीका

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्‍या देहलीतील निवासस्‍थानी श्री गणेशाची आरती करतांना पंतप्नधान नरेंद्र मोदी

नवी देहली –  इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्‍सवाला विरोध आहे, असे वक्‍तव्‍य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. पंतप्रधान मोदी यांनी ११ सप्‍टेंबरला सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सरन्‍यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्‍या देहलीतील निवासस्‍थानी जाऊन चंद्रचूड यांच्‍या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावर काँग्रेसने ‘ही भेट घटनाबाह्य आहे’, अशी टीका केली. त्‍याला मोदी यांनी प्रत्‍युत्तर दिले.

पंतप्रधान पुढे म्‍हणाले, काँग्रेस ‘फोडा आणि राज्‍य करा’ या नीतीचा अवलंब करत आहेत. सत्ता मिळवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्न आहे. श्री गणेशाच्‍या पूजेवर त्‍यांचा आक्षेप आहे. गणेशोत्‍सव आमच्‍यासाठी केवळ श्रद्धेचा विषय नाही किंवा तो नुसता सण नाही. गणेशोत्‍सवाने आपल्‍या स्‍वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्‍या वेळीदेखील ‘फोडा आणि राज्‍य करा’ या नीतीचा अवलंब करत आमचे शोषण करणारे इंग्रज गणेशोत्‍सवाला विरोध करत होते. आजही काही सत्तापिपासू लोक आपल्‍या समाजात फूट पाडण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यांचा श्री गणेशपूजेवर आक्षेप आहे.