ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन
मानव सेवा प्रतिष्ठान, चेंबूर शाखेच्या वतीने निवेदनात कारवाईची मागणी
मुंबई – प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी एका अधिवेशनात अश्लाघ्य भाषा वापरणार्या संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. येथील मानव सेवा प्रतिष्ठान, चेंबूर शाखेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश गायकवाड आणि नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी मानव सेवा प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायकजी शिंदे, चेंबूर विभाग समन्वयक श्री. सुरेंद्र बोरा, सर्वश्री विनोद जाधव, संतोष मौर्य, शिवराम रजक, ज्ञानेश्वर घाडगे, प्रवीण सुर्वे, पवन यादव, अविनाश महाडिक, भरतभाई हे कार्यकर्ते उपस्थित होते.
वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन
गणेशोत्सव संपताच वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.