पिसवली (कल्याण) येथे ४ बांगलादेशींच्या मुसक्या आवळल्या
पिसवली (कल्याण) – येथे ४ घुसखोरी केलेले बांगलादेशी नागरिक रहात होते. येथे ते २ महिला आणि २ पुरुष हे मोलमजुरी करत होते. (बांगलादेशींसाठी उद्यान बनलेला भारत ! – संपादक) महंमद हुसेन, तौसिफ शेख, लकी शेख आणि रुक्साना शेख अशी त्यांची नावे आहेत. महंमदला बांगलादेशातून भारतात येत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली होती. काही दिवसांनी तो परत भारतात आला. याची माहिती जवानांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना दिली. या चौघांविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.